अकोला दिव्य न्युज ब्युरो : गोंदियामध्ये फ्लाईंग क्लबचे प्रशिक्षण देणारं विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर न उतरता चक्क मिहानच्या टॅक्सीवे वरती उतरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने सेफ लँडिंग झाले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. चक्क टॅक्सी वे वर विमान land करण्याचा पराक्रम महिला पायलटने केला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या इंदिरा गांधी उड्डाण अकॅडमीच्या महिला पायलटने गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून झेप घेतली होती. हे विमान नागपूर विमानतळावर उतरून परत गोंदियाला जाणार होतं.एअर ट्राफिक कंट्रोलरचा विमानाशी संपर्क तुटल्याने शोध सुरू झाला. तेव्हा हे विमान मिहानमध्ये उतरल्याचं समोर आलं.
फ्लाईंग क्लबचे अधिकारी दुपारनंतर नागपुरात दाखल झाले आणि रात्री आठ वाजताच्या सुमारास पुन्हा या विमानाने गोंदियाकडे झेप घेतली.