अकोला दिव्य न्युज ब्युरो: सर्वोच्च न्यायालयाच्या शेतकरी मसुदा समितीचे सदस्य व स्वंतत्र भारत पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट अकोला दौऱ्या वर येत आहेत. अशी माहीती शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा यांनी दिली आहे.
शुकवार दि 24 नोंव्हेबर रोजी दुपारी 1 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथील गायवाडा सभागृहात ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पंजाब हरीयाणा प्रातांत शेतक-याचे झालेले मोठे आंदोलन व वर्तमान देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणार आहेत. सायंकाळी 6 वाजता स्थानीक विश्राम गृहात अनिल घनवट यांची पत्रकार परीषद होणार आहे यावेळी घनवट यांच्या समवेत शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे, स्वांतत्र भारत पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मधु हरणे, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमाताई नरोडे उपस्थित राहणार आहेत.
शुकवारी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आयोजित मेळाव्याला शेतकरी, व्यापारी, कामगार, बेरोजगार, महिल व विदयार्थी यांनी उपस्थित राहावे असे आयोजन समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या आयोजन समितीत अविनाश पाटील नाकट, सतिश देशमुख, विलास ताथोड, डॉ निलेश पाटील, सुरेश जोगळे, विनोद पाटील मोहकार, शंकर कवर, लक्ष्मीकांत कऊटकर, व विनोद राऊत यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला समाजातील विविध घटकांची उपस्थिती व देशातील वर्तमान परिस्थीतील विचार मंथन हे निश्चित प्रेरदायी ठरणार असल्याची माहीती धनंजय मिश्रा यांनी प्रत्रकातून दिली आहे.