अकोला दिव्य न्युज ब्युरो : गरीब आणि कष्टकऱ्यांच्या दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शासनामार्फत वितरित करण्यात येत असलेला ‘आनंदाचा शिधा’ सोंडे, अळ्या, किड आणि जाळेयुक्त निघाल्याने तीव्र संतापाची लाट पसरली आहे. ही गरीबांची क्रुर थट्टा असून, ‘आनंदाचा शिधा’ शुध्द धुळफेक आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
गुढीपाडवा या मराठी नववर्षापासून राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत सणांनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात येत आहे.नुकतेच दिवाळी सणासाठी साखर, हरभरा डाळ, रवा प्रत्येकी एक किलो आणि 1 लिटर पामतेल अशा खाद्य वस्तू असलेला ‘आनंदाचा शिधा’चे अनेक ठिकाणी वितरण करण्यात आले. मोठ्या उत्साहाने हा शिधा घेऊन घरी आणून उघडले. तेव्हा शिधाधारकांना धक्कादायक प्रकार बघायला मिळाला. हरभरा डाळीतील प्रत्येक दाणा डोचलेला आणि सर्वत्र सोंडे झालेले दिसून आले. कीड लागून पीठ बऱ्यापैकी पावडर झाले होते. तर रव्यात जाळे आणि आळ्या होत्या. ( फोटो बघा) पामतेल की डालडा असा प्रश्न उपस्थित झाला. एवढे पामतेल घट्ट झालेले होते.
अनेकांनी आनंदाचा शिधातील डाळ, पीठ,रवा उन्हात वाळवायला ठेवले. पण आळ्यांवर उन्हाचा परिणाम झाला नाही आणि सोंडे डाळीतून बाहेर पडायला तयार नाही.घट्ट असलेले पामतेल खाण्यास योग्य आहे का ? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील गतिमान सरकाराने वितरित केलेला शिधा आणि सबका साथ सबका विकास म्हणणारे केंद्रातील मोदी सरकारच्या या योजनेत मोठा भ्रष्टाचार होतोय, हे निकृष्ट दर्जाचा शिधा बघितले तर स्पष्ट करण्यास कोणाची गरज नाही.