Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedमोहम्मद शमीला अटक…! दिल्ली पोलिसांचे ट्वीट; मुंबई पोलिस उत्तर देत म्हणाले….

मोहम्मद शमीला अटक…! दिल्ली पोलिसांचे ट्वीट; मुंबई पोलिस उत्तर देत म्हणाले….

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड संघाचा दणदणीत पराभव केला. बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातील विजयाने भारताने अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे. २०१९ मध्ये भारताला अंतिम फेरीतून बाहेर काढणाऱ्या न्यूझीलंड संघाला ७० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयाचे श्रेय संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाला जात असले तरी विजयाचा खरा हीरो ठरलेल्या मोहम्मद शमीचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे. शमीच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला सहज विजय मिळवता आला. त्यामुळे सामना संपण्यापूर्वीच मोहम्मद शमी सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. या ट्रेंडमध्ये सहभागी होण्यापासून दिल्ली आणि मुंबई पोलिसही स्वत:ला रोखू शकले नाहीत. दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी या विजयाच्या जल्लोषात हटके ट्वीट केले.

दिल्ली व मुंबई पोलिसांचे व्हायरल ट्वीट
सर्वप्रथम दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना एक ट्वीट टॅग करीत लिहिले की, आज रात्री न्यूझीलंडविरुद्धच्या हल्ल्यानंतर तुम्ही मोहम्मद शमीला अटक करणार नाही, अशी आशा आहे. दिल्ली पोलिसांच्या या ट्वीटला उत्तर देत मुंबई पोलिसांनी लिहिले की, दिल्ली पोलिस, तुम्ही असंख्य हृदय चोरल्याच्या गंभीर आरोपांवर गुन्हा दाखल करण्यात अयशस्वी झालात. कारण- इतर काही लोकांनाही आरोपी केले. त्यातील काही सहआरोपींची यादी आम्ही तयार करीत आहोत’. यात मुंबई पोलिसांचे असे म्हणणे आहे की, दिल्ली पोलिसांनी सामन्याचे नायक विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, के. एल. राहुल व जसप्रीत बुमराह यांचा उल्लेख केला नाही. दिल्ली आणि मुंबई पोलिसांचे हे मजेशीर ट्विट आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

विशेष म्हणजे दिल्ली आणि मुंबई पोलिसांच्या या ट्वीटच्या खेळात मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांनीही उडी घेतली. दिल्ली आणि मुंबई पोलिसांच्या ट्वीटला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, दिल्ली पोलिस यात कोणतेही प्रकरण घडत नाही. त्यांनी लिहिले की, दिल्ली पोलिस अजिबात नाही. हे स्वसंरक्षणाच्या अधिकारांतर्गत केले गेले आहे; जे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य आणि न्याय्य आहे. काही वेळातच मुंबई पोलिस आणि दिल्ली पोलिसांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. मोहम्मद शमीने या सामन्यात सात विकेट्स घेतल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!