Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याअकोला 'धोकादायक' शहर ! एक्युआय 124 ; फुफ्फुस व श्वसनासंबंधी आजार जडण्याची...

अकोला ‘धोकादायक’ शहर ! एक्युआय 124 ; फुफ्फुस व श्वसनासंबंधी आजार जडण्याची शक्यता

अकोला दिव्य न्युज ब्युरो : देशभरासह अकोला शहरात दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. अकोला शहर व परिसरातील कानाकोपऱ्यात असलेल्यांकडूनही दिवाळी साजरी केली जातेय. एकीकडे देशात वायू प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने मर्यादित स्वरुपात फटाके फोडण्याला परवानगी दिली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला झुगारत देशभरासह अकोला शहरात आणि परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यामुळे आज सोमवार १३ नोव्हेंबरला सकाळी ९० च्या आसपास असलेला AIQ दुपारी १.४० वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार अकोला शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक अर्थात AIQ १२४ होता.

स्वीस ग्रुप IQAir ने हा अहवाल दिला असून, १०१ वरील सर्व AIQ धोकादायक मानला जातो. अकोला शहराचा AIQ १२४ असल्याने अकोला शहरातील हवा सर्वाधिक धोकादायक झाली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२४ वर असल्याने अकोला शहरातील लोकांना फुफ्फुसासंबंधी श्वसनासंबंधी आजार जडण्याची शक्यता जास्त आहे.

पर्यावरण आणि मानवी आरोग्याच्या संदर्भात दररोजच्या हवेच्या गुणवत्तेची नोंद करण्यासाठी वापरली जाणारे एक संख्यात्मक प्रमाण म्हणजे हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच Air Quality Index . ० ते ५० AIQ असलेल्या शहरात कोणतेही वायू प्रदूषण नसते. तर, ५१ ते १०० मध्यम धोकादायक तर, १०१ वरील सर्व AIQ धोकादायक मानला जातो. हवेचा गुणवत्ता निर्देशांक १०१ वर असेल. तर त्या शहरातील लोकांना फुफ्फुसासंबंधी, श्वसनासंबंधी आजार जडण्याची शक्यता असते. जागतिक आरोग्य संघटनेने AIQ निश्चित केलेले आहेत. लाइव्ह रँकिंगनुसार अकोला सिटीला प्रदुषित घोषित करण्यात आले आहे.

तीन शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे म्हणून गणली गेली आहेत. यामध्ये पहिल्या नंबरवर देशाची राजाधानी दिल्लीचा क्रमांक लागतो. सकाळी ११.५२ पर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत ४१२ हवा गुणवत्ता निर्देशांक होता. तर त्यापाठोपाठ लाहोर (पाकिस्तान), बघदाद (इराक), कराची (पाकिस्तान), कुवैत शहर (कुवैत), कोलकत्ता (भारत), ढाका (बांगलादेश), मुंबई (भारत), सराजेवो (बोसनिया), दोहा (कतार) आदी दहा शहरांचा क्रमांक लागतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!