Wednesday, January 15, 2025
HomeUncategorizedSINGHAM 3 ! करीना कपूरचा 'सिंघम अगेन' मधील फर्स्ट लूक प्रदर्शित

SINGHAM 3 ! करीना कपूरचा ‘सिंघम अगेन’ मधील फर्स्ट लूक प्रदर्शित

Kareena Kapoor Look Singham 3 : अकोला दिव्य न्युज ब्युरो : बहुचर्चित ‘सिंघम 3’ सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सिंघम 3’ची घोषणा झाल्यापासून, या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. आता हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असून या सिनेमातील अभिनेत्री करीना कपूरचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘सिंघम 3’ मध्ये करीना कपूर मुख्य भूमिकेत असून तीचा फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर करत करीनाने लिहिलं आहे की, “सैन्यात सामील होण्याची आता पुन्हा वेळ आली आहे”. या पोस्टरमध्ये करीनाच्या हातात बंदूक आणि चेहऱ्यावर धगधगती आग बघायला मिळत आहे.

करीनाचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. करीनाच्या फोटोवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अॅक्शन मोडमध्ये पुन्हा एकदा, आली रे आली अवनी बाजीराव सिंघम आली, आता फक्त सिनेमाची प्रतीक्षा, कमाल पोस्टर, बेबोचं कमबॅक, क्वीन अशा कमेंट्स सध्या चाहते करत असल्याचे दिसत आहे.

रोहित शेट्टीने करीनाचा पहिला लूक शेअर करत सांगितले आहे की, “सिंघम’ची खरी ताकद… अवनी बाजीराव सिंघम आहे. 2007 मध्ये आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं. ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल 3’, ‘सिंघम रिटर्न’ असे ब्लॉकबस्टर सिनेमा आम्ही दिले आहेत. आता चौथ्या सिनेमासाठी सज्ज झाले आहोत. या 16 वर्षांमध्ये काही बदल नाही. करीना त्यावेळी जशी होती, साधी, सरळ, प्रेमळ आणि मेहनती तशीच आज देखील आहे”. ‘सिंघम 3’ या सिनेमाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.

करीना कपूरचा ‘जाने जान’ हा सिनेमा गेल्या काही दिवसापासून चाहत्यांच्या भेटीला आला होता. आता करीनाचे ‘सिंघम 3’सह ‘द क्रू’,’वीरे द वेडिंग 2′,’द बकिंघम मर्डर्स’ आणि ‘तख्त’ हे सिनेमे चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. करीनाचे चाहते या सिनेमांची मोठ्या आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!