अकोला दिव्य न्युज ब्युरो : माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि माहेश्वरी समाज ट्रस्टचे माजी सचिव चौथमल सारडा यांना ज्येष्ठ समाज भूषण जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकोला येथील जेष्ठ नागरिक संघाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जेष्ठ उद्योजक वसंत कुमार खंडेलवाल यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
अकोला येथील जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपद भूषविलेले चौथमल गुलाबचंद सारडा यांचा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा सक्रिय सहभाग असतोच.यासोबतच इतर अनेक उपक्रम आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहभागातून सारडा करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन चौथमल सारडा यांना ज्येष्ठ समाज भूषण जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
स्थानिक बी.आर.हायस्कुल येथे आयोजित सत्कार सोहळ्यात मंचावर प्रमुख अतिथी वंसतकुमार खन्डेलवाल, नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रकाश शेगोकार, सचिव सत्यनारायण बाहेती, अतिरिक सचिव फेसकॉम विनायकराव पांडे व इतर मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात चौथमल सारडा यांचा सहपत्नीक औक्षण करून शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले असता, राधेश्याम सारडा, प्रकाश सारडासह सारडा कुटुंबातील सदस्य आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. अकोला दिव्य परिवारातील सदस्य असलेले चौथमल सारडा यांचे या सन्मानार्थ अभिनंदन.