Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यअकोलेकरांनो खबरदार ! वायू प्रदूषणात वाढ : आरोग्य विभागाची नियमावली जाहीर

अकोलेकरांनो खबरदार ! वायू प्रदूषणात वाढ : आरोग्य विभागाची नियमावली जाहीर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : खराब रस्ते, शहरात होत असलेले बांधकाम, गाड्यांचे प्रदूषण या कारणांमुळे अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहरात सर्वत्र धुळीचे लोट वाहत असल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने नागरिकांना खबरदारीचा सल्ला दिला आहे.हवेची गुणवत्ता खालावल्याने त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. धूलिकण वाढल्याने आरोग्य विभागाकडून मास्क वापरण्याचं आवाहन केले आहे.

अकोला येथील मोठ्या पुलावरचे सायंकाळी ६ वाजताचे दृश्य

राज्यातील मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढताना दिसत आहे. धुळीचे शहर म्हणून अकोला शहराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, ‘अकोला ‘ शहरांसाठी आरोग्य विभागाने नियमावली जाहीर केली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वूमीवर राज्य सरकारने मास्क वापरण्याला प्राधान्य द्यावे.

अकोला शहराच्या सोबतीला मुंबई, नाशिक, अमरावती, सांगली, सोलापूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, अकोला, बदलापूर, उल्हासनगर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, चंद्रपूर, नवी मुंबई येथील नागरिकांना खबरदारीचा सल्ला दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!