गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : प्रत्येक मानवी मनात, विविध कलेची जडण घडण होत असते. भिन्न व्यक्तींना मिळणाऱ्या संधीवर आणि वेळेवर त्यांच्यातील कलेचा दर्जा कमी-अधिक असू शकतो. आवश्यकता असते ती त्या गुणांना हेरुन, वाढवण्यासाठी प्रेरण देणारी, किंबहूना खत-पाणी घालणारी पारखी नजर.अशी ती पारखी नजर असणा-या भगिनींनी पुढाकार घेऊन सकारात्मक कार्यासाठी ‘गुणग्राहकता’ वेचून घेण्यास्तव आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘सहज सुचलं’ म्हणून सुरु केलेली वाटचाल निश्चितच समाजाला नवीन दिशा देण्याचे काम करेल.

२१ शतकातील माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने बदलत चाललेल्या वैचारिक मंथनातून कोणी काय करावं ! हा एक गंभीर विषय होत चालला आहे.अशा दुविधेत सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करणारा व त्यांच्या कलागुणांना सदैव चालना देणारा सहज सुचलंचा 15 वा व्हाॅट्सअप गृप अकोल्यातील “आदिशक्ती” कडून सुरु करण्यात आला. मुळात मनाला मोठा दिलासा मिळाला आहे.या गृपसाठी अकोल्याच्या मुळ रहीवाशी व साहित्यिक मनाच्या प्रांजल प्रशांत रायपुरे यांनी अग्रक्रम घ्यावा. म्हणजे “सोने पर सुहागा” !
सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या जेष्ठ मार्गदर्शिका मायाताई कोसरे व राजूरा निवासी अधिवक्ता मेघा धोटे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सहज सुचलं (महिलांच्या हक्काचे व्यासपीठ) असे नांव धारण करणाऱा सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप नव्याने सुरू करण्यात आला आहे.अकोला गृपच्या संयोजिका प्रांजल रायपुरे ह्या उच्च शिक्षित असून आज पर्यंत त्यांनी बरेच साहित्य लिहून काढले आहेत.

विदर्भातील काही वृत्तपत्रात व मासिकात त्यांचे साहित्य प्रकाशित देखील झाले आहे.या नव्या वाटेवरचा प्रवास सुरू करणा-या रायपुरे यांनी नुकत्याच दोनशे काव्यरचना लिहून काढल्या आहेत.लवकरच त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे.प्रांजळ यांच्या सोबतीने चंद्रपूर जिल्ह्यातील सावलीच्या सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार सहसंयोजिका आहे. आजच्या घडीला सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपची (सर्व गृप मिळून )सदस्य संख्या पाच हजारच्या घरात आहे.हे उल्लेखनीय आहे. दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य जेष्ठ मार्गदर्शिका उपराजधानी निवासी मायाताई कोसरे , चंद्रपूर प्रख्यात साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, भद्रावतीच्या व्हॅर्च्युअस मल्टिपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी, चंद्रपूर -गडचिरोली या जुळ्या जिल्ह्याच्या सहज सुचलं गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका वर्षा कोंगरे व अन्य सदस्यगणांनी प्रांजल रायपुरे यांचे अभिनंदन केले आहे.

येत्या १जानेवारीला सहज सुचलं गृप दहाव्या वर्षात थाटात पदार्पण करीत असून सहज सुचलं म्हणून सुरु केलेला हा प्रवास येत्या काळात निश्चितच नवीन दिशा देत, दशा सुधारेल, यात दुमत असण्याचे कारण नाही आणि तोपर्यंत हा प्रवास ‘रुकेगी’ नाही.या ठाम विश्वासाने सर्वांचं अभिनंदन. विशेषत: साहित्यातून वैचारीक बैठक समृद्ध करण्याच्या ‘प्रांजल’ हेतूने यासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रांजल प्रशांत रायपुरे यांना मनस्वी शुभेच्छा. शेवटी एकच की,
‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती’