Wednesday, January 15, 2025
Homeराजकारणमहाराष्ट्र भाजपचा 'डबल गेम' ! 'सुपर वॉरियर्स' च्या नेमणूका अन् 'वॉररूम' ची...

महाराष्ट्र भाजपचा ‘डबल गेम’ ! ‘सुपर वॉरियर्स’ च्या नेमणूका अन् ‘वॉररूम’ ची उभारणी निम्म्या मतदार संघात पुर्ण

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०० सुपर वॉरिअर्स नेमण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. आतापर्यंत १४० विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी १०० सुपर वॉरिअर्स नेमले आहेत. विविध विधानसभा मतदारसंघांमधील पक्षाच्या कोअर कमिटीकडून ही नावे प्रदेशाकडे पाठविलेली होती. २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण १० हजार ८०० जणांची नियुक्ती केली जाईल. दिवाळीनंतर या सर्वांना प्रदेश भाजपकडून विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजप वॉररूम सुरू करणार असून आतापर्यंत जवळपास १३५ वॉररूम उभारण्याचे काम झाले आहे. तीन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ‘महाविजय २०२४’साठी नियुक्त समितीचे अध्यक्ष आ. श्रीकांत भारतीय यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत या कामाचा आढावा घेण्यात आला. 

एका विधानसभा मतदारसंघात साधारणत: २८० ते ३०० बुथ असतात. प्रत्येक सुपर वॉरिअरला तीन बुथची जबाबदारी दिली जाईल. त्या बुथअंतर्गत येणाऱ्या भागात केंद्र व राज्य सरकारच्या योजनांशी लोकांना जोडणे, त्यांच्याशी सातत्याने संपर्क, निवडणुकीच्या दृष्टीने करावयाची तयारी, याची जबाबदारी त्यांच्यावर राहील. २०१९ मध्ये अबाधित शिवसेनेकडून निवडून गेलेले १८ पैकी १३ खासदार आज शिंदेंसोबत आहेत. राष्ट्रवादीचे केवळ सुनील तटकरे हेच अजित पवार यांच्यासोबत गेले, बाकीचे खासदार  शरद पवार यांच्यासोबत आहेत. भाजपने लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

‘शिंदे-अजित पवारांच्या पक्षांशी युती असून, शेवटी केंद्रात भाजपची सत्ता येणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी सगळेकाही करावेच लागणार आहे. पण कवायत स्वबळासाठी तर नाही ना ? लोकसभा निवडणूक भाजप हा मित्रांसोबत लढेल, हे स्पष्टच आहे; पण विधानसभा निवडणुकीत काही वेगळे घडले, तर स्वबळाचीही तयारी असावी, असा उद्देश स्पष्टपणे दिसून येते. तसे नसते, तर केवळ लोकसभा निवडणुकीपुरतेच सुपर वॉरिअर्स नेमले गेले असते !

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!