अकोला दिव्य न्युज ब्युरो : विशिष्ट शैलीने विशेष प्रकारच्या ‘केक’ सोबतच इतर अन्य प्रकारचे कुकिंग व्यंजन तयार करण्याचे ऑनलाईन पद्धतीने हजारो स्वादप्रेमियांना शिक्षण देण्यात यशस्वी झाल्याबद्दल, शहरातील आलिमचंदाणी परिवारातील मोरिशा मुकेशलाल आलिमचंदाणी हिचा जगप्रसिद्ध शेफ संजीव कपूरच्या हस्ते गौरव करण्यात आला.
केरळातील कोची येथे नुकत्याच पार पडलेल्या Global Food & Hospility Award 2023 या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत देश-विदेशातील हजारो स्वादप्रेमियांना मोरिशा हिने ऑनलाईन पद्धतीने बेकिंग व्यंजन तयार करण्याचे यशस्वी प्रशिक्षण दिले. सांगता समारंभातील प्रमुख पाहुणे व जगप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या हस्ते मोरिशा मुकेशलाल आलिमचंदाणी हिला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आपल्या कुटुंबासोबत अकोला शहराचे नावलौकीक करणा-या मोरिशा हिने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दिले आहे.
अकोला जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ता, प्रतिष्ठित व्यवसायिक आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी नगराध्यक्ष हरिशभाई आलिमचंदानी यांची मोरिशा ही पुतणी असून मुकेशलाल आलिमचंदाणी यांची मुलगी आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.