Friday, November 22, 2024
Homeन्याय-निवाडाBig News ! केजरीवालांना जामीन; तर सीबीआय प्रकरणात 18 जुलैला सुनावणी

Big News ! केजरीवालांना जामीन; तर सीबीआय प्रकरणात 18 जुलैला सुनावणी

अकोला दिव्य ऑनलाइन : पीएमएलए कायद्यानुसार ईडीने अटक केलेल्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. परंतू, सध्या केजरीवाल सीबीआयच्या कोठडीत आहेत. यामुळे त्यांना जामीन मिळाला असला तरी कारागृहाबाहेर येऊ शकणार नाहीत. दरम्यान, ईडीने केलेल्या अटकेविरोधात केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यामध्ये आपल्याला केलेली अटक ही बेकायदेशीर होती, असा दावा त्यांनी केला होता. केजरीवालांचे वकील विवेक जैन यांनी सांगितले की, सीबीआय प्रकरणावर १८ जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी आहे. या सुनावणीच्या निकालानंतरच केजरीवाल बाहेर येणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. मात्र केजरीवाल तुरुंगात बाहेर येण्याची शक्यता अधिक असल्याचे ते म्हणाले.

केजरीवालांनी ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करुन ईडीच्या अटक कारवाईला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका मोठ्या खंडपीठाकडे सोपविली आहे. यावर आता तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ सुनावणी घेणार आहे. यासाठी डी वाय चंद्रचूड तीन न्यामूर्तींची नेमणूक करणार आहेत. या सुनावणीपर्यंत केजरीवालांना अंतरिम जामीन देण्यात आला आहे. केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टानेही जामीन दिला होता. परंतू, ईडीने हायकोर्टात धाव घेत तो रद्द केला होता. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!